Pune ACB Trap Case | पुणे : लाच घेताना भुमी अभिलेख कार्यालयालयातील खासगी महिला टायपिस्ट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap Case | जमीमीनीच मोजणी करुन देण्यासाठी 14 हजार रुपये लाच घेतल्यानंतर पुन्हा 9 हजार रुपयांची लाच मागणी केली. तडजोडी अंती सात हजार रुपये लाच स्वीकारताना खेड येथील भुमी अभिलेख कार्यालयात खासगी टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या महिलेला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई खेड (Khed) येथील भुमी अभिलेख कार्यालय येथे सोमवारी (दि.22) करण्यात आली. (Bribe Case)

सुनंदा गणेश वाजे Sunanda Ganesh Waje (रा. तारकाई डोन, वाडा रोड, ता. खेड) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या खासगी टायपिस्टचे नाव आहे. याबाबत 55 वर्षीय महिलेने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या पतीच्या नावावर खेड तालुक्यातील मु.पो. साबर्डी येथे गट नं. 245 मध्ये 63 गुंठे शेत जमीन आहे. या गटाची मोजणी करण्यसकरीता तक्रारदार यांच्या पतीने 1 एप्रिल 2024 रोजी उपअधीक्षक भुमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.(Pune ACB Trap Case)

खासगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे ह्या सध्या नगर भुमापन अधिकारी खेड कार्यालयात खागी टायपिस्ट म्हणून काम करतात. सुनंदा वाजे यानी तक्रारदार यांच्याकडे मोजणीचे काम करुन देण्यासाठी 12 हजार रुपये व त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता दोन हजार रुपये असे एकूण 14 हजार रुपये घेतले. तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावावर असलेली शेत जमिनीची मोजणी करण्यात आली.

शेत जमिनीची मोजणी केल्यानंतर सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांना फोन करुन, मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आणलेल्या मशिनचे 6 हजार व कागदपत्रे तयार करण्यासाठी 3 हजार असे एकूण 9 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार महिलेने याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी केली.
त्यावेळी सुनंदा वाजे यांनी तडजोडी अंती 7 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने खेड येथील भुमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार महिलेकडून लाच स्वीकारताना सुनंदा वाजे हिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्यावर खेड पोलीस ठाण्यात
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबी पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”