Pune ACB Trap | लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदार ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | 9 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गोत्यात आला आहे. त्यांच्याविरूध्द पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई (Pune Bribe Case) केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap)

पोलिस प्रदीप दत्तात्रय काळे Pradeep Dattatraya Kale (44) यांच्याविरूध्द बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्याविरूध्द बारामती तालुका पोलिस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात न्यायालयाने तक्रारदारास पोलिस ठाण्यात हजेरी देण्याबाबत आदेश दिले होते. त्या हजेरीची नोंद घेण्यासाठी व गुन्हयाच्या तपासात तक्रारदाराच्या बाजुने मदत करण्यासाठी पोलिस हवालदार प्रदीप काळे यांनी लाचेची मागणी केली होती. (Pune ACB Trap)

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीची पडताळणी केली असता पोलिस हवालदार काळे हे 9 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करीत
असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title : Pune ACB Trap | Demand Case Bribe Pune ACB Trap Police Havaldar In Trouble

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Suresh Hemnani | महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी सुरेश हेमनानी यांची नियुक्ती

MLA Siddharth Shirole | सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा; विशेष निधीच्या तरतुदीची गरज – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Devendra Fadnavis | देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षकांना निवेदन

Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मालोजीराजे भोसले पर्यटन विकास आराखड्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातली आरोग्य यंत्रणा कोलमडली; सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढावा – अजित पवार

Pune Crime News | बारामती तालुक्यातील खांडजमध्ये गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू, पिता-पुत्राचा समावेश

Sukesh Chandrasekhar | 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या आयुष्यावर येणार सिनेमा? कोण साकारणार भूमिका