Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | फसवणूक प्रकरणात (Cheating Fraud Case) पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अर्जाच्या चौकशी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या खाजगी व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी 25 हजार रुपये स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यवसाय करणाऱ्या खासगी व्यक्तीला रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.21) कात्रज परिसरातील सुखसागर नगर (Sukhsagar Nagar, Katraj) येथील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर येथे केली. (Pune Bribe Case)

तुषार शीतल बनकर Tushar Sheetal Bankar (वय-30 रा. आंबेगाव पठार, पुणे) असे लाच घेताना अटक केलेल्या खाजगी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 42 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharti Vidyapeeth Police Station) सायबर युनिट कडे फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे (PSI Sanjay Narle) यांच्याकडे आहे. संजय नरळे यांना सांगून मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तुषार बनकर याने संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली. (Pune ACB Trap)

एसीबीच्या पथकाने 13 आणि 20 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. त्यावेळी आरोपी तुषार बनकर याने तक्रारदार यांच्याकडे फसवणुकीच्या प्रकरणात मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी पीएसआय संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्यास सांगून लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपांची मागणी केली. त्यानुसार बुधवारी सुखसागर नगर चौकातील स्वामी समर्थ स्नॅक सेंटर जवळ पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये स्वीकारताना तुषार बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी

Pune Kondhwa Crime | रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचे तोंड दाबून गैरवर्तन, आरोपीला अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Pune News | साहित्य परिषदेचा चालता बोलता इतिहास हरपला ! कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे निधन