Pune ACB Trap | 60 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | डिसॅबिलिटी सर्टिफिकेट (Disability Certificate) मिळवून देण्यासाठी 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेणार्‍या ससून हॉस्पीटलमधील (Sasoon Hospital) डॉक्टरला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Pune Bribe Case) . डॉक्टरला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली (Pune Crime News)असून त्यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap)

 

डॉ. पवन भिला शिरसाठ Dr. Pawan Bhila Shirsath (43, भौतिकोपचार तज्ञ, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालय, पुणे) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यामधील तक्रारदार हे शासकीय सेवेत आहेत. त्यांनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळण्यासाठी ससून हॉस्पीटलमध्ये अर्ज केला होता. ते सर्टिफिकेट देण्यासाठी डॉ. पवन शिरसाठ यांनी दि. 3 आणि दि. 6 एप्रिल 2023 रोजी तक्रारदाराकडे सुरूवातीला 60 हजार रूपयांची आणि नंतर 50 हजार रूपयांची मागणी केली. (Pune ACB Trap)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी डॉ. पवन शिरसाठ यांनी 60 हजार रूपयांची लाच मागुन ती सरकारी पंचासमक्ष घेतली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना लाच घेतल्यानंतर ताब्यात घेतले. ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला 60 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (PI Praneta Sangolkar) आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक सांगोलकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune ACB Trap | Dr. Pawan Bhila Shirsath from Sassoon Hospital was arrested by
anti-corruption in connection with a bribe of 60 thousand rupees.


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Gram Panchayat Bypolls Election | राज्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची घोषणा, 3666 जागांसाठी 18 मे रोजी मतदान

Rapper Ram Mungase Arrest | 50 खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक, रोहित पवारांचा संताप; म्हणाले – ‘तर हा सरकारचा कबुली जबाबच नाही का?’

Pune Job Fair | पुण्यात 2023-24 मधील पहिला रोजगार मेळावा 12 एप्रिलला

Aadhaar Updation Pune | आधार अद्ययावतीकरणाला गती देण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र सुरू

Pimpri Chinchwad RTO | वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या वेळेत बदल