Pune ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (Prime Ministers Employment Generation Programme (PMEGP) उद्योगाकरिता सादर केलेला प्रस्ताव बँकेकडे पाठवण्यासाठी 2 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) जिल्हा उद्योग केंद्रातील (District Industry Centre) उद्योग निरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहात पकडले. चंद्रभान परशमुराम गोहाड Chandrabhan Parashamuram Gohad (वय-57) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीने (Pune ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.13) जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयात सापळा रचून केली.

याबाबत 26 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. चंद्रभान गोहाड यांनी तक्ररारदार यांच्याकडून यापूर्वी 500 रुपये रोख फोन पे अ‍ॅप वरुन 1000 हजार रुपये लाच घेतली आहे. शुक्रवारी दोन हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडले.

तक्रारदार यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खिळे निर्मिती उद्योगाकरीता अर्ज केला होता.
तक्रारदार यांचा प्रस्ताव बँकेकडे शिफारशीसह पाठवण्यासाठी चंद्रभान गोहाड यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केल्यानंतर 9 जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता गोहाड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना चंद्रभान गोहाड यांना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत
(Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने (Police Inspector Virnath Mane) करीत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या पथकाने केली.

Web Title :- Pune ACB Trap | Industry Inspector of District Industry Center caught in anti-corruption net while taking bribe of Rs.2 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या

Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक