Pune ACB Trap | ठेकेदाराकडून 2 हजार रुपये लाच घेताना महावितरणचा कनिष्ठ अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्राहकांच्या घरगुती वीज कनेक्शनच्या (Domestic Electricity Connection) कामाचे मंजुरी पत्रक तयार करण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी करुन दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) महावितरणच्या (Mahavitaran) राजगुरुनगर उपविभागाचा कनिष्ठ अभियंत्याला (Junior Engineer) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहाथ पकडले. अजय दत्तात्रय शेवकरी (Ajay Dattatraya Shevkari) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसबीने (Pune ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि. 23) केली. (Pune Bribe Case)

 

याबाबत एका ठेकेदाराने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे विद्युत ठेकेदार असून त्यांच्याकडील ग्राहकांचे घरगुती विज कनेक्शनच्या कामांचे मंजुरी पत्रक तयार करण्यासाठी अजय शेवकरी यांनी शासकिय शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केली. शेवकरी यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती दोन हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पडताळणी केली असता अजय शेवकरी यांनी सहा हजार रुपये लाचेची मागणी करुन दोन हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्विकारताना अजय शेवकरे यांना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act)
गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेण्यात आले.
अजय शेवकर यांना विशेष न्यायालय खेड (Special Court Khed) येथे हजर केले
असता न्यायालयाने त्यांना 27 फेब्रुवारी पर्य़ंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे.
पुढील तपास पुणे एसीबीच्या पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार (DySP Kranti Pawar) करीत आहेत.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | Junior engineer of Mahavitaran arrested by anti-corruption while accepting bribe of 2 thousand rupees from contractor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त, परिसरात खळबळ

Onkar Bhojane | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बड्या चित्रपटांची ऑफर

Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21 मार्चपर्यंत स्थगिती