Pune ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | केलेल्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर (Approved Pending Bill) करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) पाणी पुरवठा विभागातील (Water Supply Department) कनिष्ठ अभियंत्याला (Junior Engineer) ठेकेदाराकडून 30 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.13) स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. व्यंकटेश लक्ष्मण पाटील Venkatesh Laxman Patil (वय-47) असे लाच घेताना पकडलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.

 

याबाबत 60 वर्षीय ठेकेदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली आहे. तक्रारदार हे ठेकेदार (Contractor) असून त्यांनी स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील (Swargate Water Supply Department) धायरी परिसरात पाण्यासंदर्भात कामे केली आहेत. या कामांचे सुमारे चार लाख रुपये बिल थकीत असून तक्रारदार यांनी थकीत बिल मंजूर करण्याची मागणी व्यंकटेश पाटील याच्याकडे केली होती. थकीत बिल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ अभियंता पाटील याने 30 हजार रुपये लाच मागितील. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली.

पुणे एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.12) पडताळणी केली.
त्यावेळी स्वारगेट पाणी पुरवठा विभागातील धायरी प्रभाग 33 आणि 33 क परिसरात तक्रारदार यांनी पाण्यासंदर्भात कामे केली होती.
आणि या कामाचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी पाटील याने 30 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
आज स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना व्यंकटेश पाटील याला रंगेहात पकडण्यात आले.
पाटील याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम (Prevention of Corruption Act) 7 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पुणे पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे (Police Inspector Sandeep Varhade) करीत आहेत.

Web Title :- Pune ACB Trap | Junior Engineer of Pune Municipal Corporation caught in ACB’s net while taking Rs 30 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Box Office Record | रणबीर-आलियाच्या Brahmastra च्या समोर फेल झाला अल्लू अर्जुनचा Pushpa, बॉलीवुडचाच डंका

Uric Acid | महिलांमध्ये किती असावे यूरिक अ‍ॅसिड? पहा कंट्रोल करण्यासाठी चार्ट

Diet Tips For Uric Acid | सर्वात बेस्ट आहे ‘या’ पीठाची भाकरी, ताबडतोब कमी होईल यूरिक अ‍ॅसिड, सांधेदुखीसुद्धा होईल दूर