
Pune ACB Trap News | कॉन्ट्रॅक्टर कडून लाच घेताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap News | कारोनाच्या काळात सॅनिटायझरची फवारणी केल्याचे प्रलंबित बिल तसेच सद्यस्थितीत गॅस शव दाह वाहिनीचे बिल मंजुर करण्यासाठी ठेकेदाराकडून पाच हजार रुपये लाच घेताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील (Talegaon Dabhade Nagar Parishad) लेखापाल नरेंद्र अनंतराव कणसे Narendra Anantrao Kanse (वय-55) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे एसबीने ही कारवाई बुधवारी (दि.27) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास केली. (Pune ACB Trap News)
याबाबत 38 वर्षीय ठेकेदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना तळेगाव नगरपरिषदे मार्फत स्मशानभुमीमध्ये गॅस शव दाह वाहिनीचा ठेका मिळाला आहे. तसेच कोव्हीडच्या काळात तळेगाव नगरपरिषद हद्दीत सॅनिटायझरची फवारणीचा ठेका मिळाला होता. तक्रारदार यांनी कोव्हीडच्या काळात सॅनिटायझरची फवारणी केल्याचे बिल मंजुर करण्यासाठी नरेंद कणसे यांनी तक्रारदार यांचेकडे बिलाच्या एक टक्के रक्कमेची लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना लाचेची रक्कम दिली नाही. तसेच सद्यस्थितीत तक्रारदार यांचे गॅस शव दाह वाहिनीचे बिल नरेंद्र कणसे यांच्याकडे पेंडीग आहे. बिल काढण्यासाठी व मागिल बिल काढण्यासाठी एक टक्क्याप्रमाणे पैशांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे दिली होती. (Pune ACB Trap News)
प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष 12,23 ऑगस्ट, 1,13 आणि 14 सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली.
नरेंद्र कणसे यांनी तक्रारदार यांनी कोव्हीड काळात केलेल्या सॅनिटायझर फवारणीच्या प्रलंबित बिलाचे व सद्यस्थितीत गॅस शव दाह वाहिनीच्या बिलाच्या टक्केवारीनुसार मंजुर केलेल्या बिलाचा मोबदला म्हणुन तक्रारदार यांचेकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना कणसे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, 7 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल
जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार भूषण ठाकुर, सुनील सुराडकर,
आशिष डावखर, दिपक दिवेकर यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune News | गुरुवारी पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची घोषणा