Pune ACB Trap | खुन आणि मोक्काच्या केसमधून सुटण्यासाठी 2 लाख नाही तर 10 लाखांची होती मागणी, अ‍ॅन्टी करप्शनच्या तपासात माहिती उघड

पुणे : Pune ACB Trap | पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये, आरोपी करु नये, गुन्ह्यात मदत करावी यासाठी पोलिसांकडून लाच मागितल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होते. पण, चक्क न्यायालयातून खून (Murder In Pune) आणि मोक्का (MCOCA Action In Pune) सारख्या खटल्यातून गुन्हेगारांना सोडण्यासाठी लाच मागितली (Bribe Case) जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune ACB Trap)

२०१४ मध्ये हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल असलेल्या खून व मोक्काच्या केसमधून सुटका करण्यासाठी न्यायालयातील (Shivaji Nagar Court Pune) वरिष्ठ क्लार्कने २ लाख नाही तर तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सचिन अशोक देठे Sachin Ashok Dethe (वय ३९, रा. राजगुरुनगर, खेड) याला प्रत्यक्षात दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. (Pune ACB Trap)

२०१४ मध्ये हडपसर परिसरात खूनाची घटना घडली होती. त्यात तक्रारदार याच्या मावसभावाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांना संघटीत गुन्हेगारीचा प्रकार आढळून आल्याने त्यांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. सत्र न्यायालयात या खटल्याची सध्या सुनावणी सुरु होती. त्यामुळे तक्रारदार हा सुनावणीसाठी कोर्टात येत होता. या न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सचिन देठे याने न्यायाधीशांना सांगून केसमधून सुटका करण्यासाठी मदत करतो. केसचा निकाल मार्गी लावण्यासाठी देठे याने तक्रारदाराकडे १० लाख रुपयांची मागणी केली. ही मागणी अतिशय जास्त असल्याने त्यांनी ३० नोव्हेबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली. तेव्हा देठे याने २ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीत दीड लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गणेश झेरॉक्स या दुकानासमोर तक्रारदाराकडून दीड लाख रुपये घेताना देठे याला रंगहाथ पकडण्यात आले.

सचिन देठे याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने केलेली लाचेच्या मागणीबाबतचा टेलिफोनवरील
संवाद रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यासाठी आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे.
आरोपीने ज्या खटल्यासाठी लाचेची मागणी केली. त्या खटल्याची कागदपत्रांची माहिती घ्यायची आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या मुळ तक्रारीमध्ये पोलीस तपास अधिकार्‍यांनी दिलेल्या कागदपत्रांची प्रत देण्यासाठी
सचिन देठे याने गुगल पेद्वारे २ हजार रुपये स्वीकारल्याचे (Google Pay) नमूद केले होते.
त्याबाबतही तपास करायचा आहे. तसेच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा
असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

Naresh Mhaske | …यात शिवरायांचा अपमान नाही? नरेश म्हस्केंनी केली कविता

IPL 2023 | आता IPL मध्ये लागू होणार इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम; जाणून घ्या नियम