Pune ACB Trap on Divisional Inspector | मिळकत कर नावावर करुन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी, पालिकेच्या विभागीय निरीक्षकावर एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap on Divisional Inspector | इमारतीचा मिळकत कर तक्रारदार यांच्या नावावर करुन देण्यासाठी आणि जूना मिळकत कर न लावण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) क्षेत्रीय कार्यालय धनकवडी (Regional Office Dhankawadi) येथील कर विभागातील विभागीय निरीक्षकावर पुणे एसीबीने (Pune ACB Trap on Divisional Inspector) गुन्हा दाखल केला आहे. संजय बबन काळे Sanjay Baban Kale (वय-45) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या विभागीय निरीक्षकाचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सोमवारी (दि.29) ही कारवाई केली.

 

याबाबत 31 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी 14 जुलै आणि 28 जुलै रोजी पडताळणी केली होती.
यावेळी विभागीय निरीक्षक काळे याने लाच मागितल्याचे (Pune ACB Trap on Divisional Inspector) निष्पन्न झाले.
तक्रारदार यांच्या इमारतीचा मिळकत कर (Income Tax) त्यांच्या नावावर करुन देण्याकरीता व जुना मिळकत कर न लावण्यासाठी विभागीय निरीक्षक काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली.
मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता विभागीय निरीक्षक काळे याने तडजोडीमध्ये 20 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पुणे एसीबीने सोमवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station)
संजय काळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे (Deputy Superintendent of Police Shital Ghogare) करीत आहेत.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

 

Web Title : –  Pune ACB Trap on Divisional Inspector | Demand for bribe of Rs 20 thousand to pay income tax FIR by ACB on divisional inspector of municipality

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा