Pune ACB Trap On PMC Officers | 40 हजाराच्या लाच प्रकरणी पुणे मनपाच्या उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap On PMC Officers | प्रत्येकी 20 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील (PMC Bundgarden Water Supply Department) उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला अटक केली आहे. त्यांना प्रत्येकी 20 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (Pune ACB Trap On PMC Officers)

 

उप अभियंता मधुकर दत्तात्रय थोरात Deputy Engineer Madhukar Dattatraya Thorat (56) आणि कनिष्ठ अभियंता अजय भारत मोरे Junior Engineer Ajay Bharat More (37) अशी लाच घेणार्‍यांची नावे आहेत. तक्रारदार यांचा टँकर मार्फत पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी आवश्यक असणारे पास मनपा कार्यालयाकडून त्यांनी घेतले होते. प्रत्येक टँकर भरताना 1 पास द्यावा लागतो. मात्र पास देवून देखील कनिष्ठ अभियंता अजय मोरे यांनी दर दिवशी 5 पेक्षा जास्त टँकर भरून पाहिजे असल्यास महिना 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. उप अभियंता मधुकर थोरात यांनी तक्रारदाराचे अनामत रक्कमेचे बील काढण्यासाठी 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. (Pune ACB Trap On PMC Officers)

 

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे Anti Corruption Bureau (ACB) Pune तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचला. त्यावेळी उप अभियंता मधुकर थोरात आणि कनिष्ठ अभियंता अजय मोरे यांनी प्रत्येकी 20 हजार रूपयाची लाच सरकारी पंचासमक्ष घेतली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप वर्‍हाडे (Police Inspector Sandeep Varhade)
आणि त्यांच्या पथकाने लोकसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

 

Web Title :- Pune ACB Trap On PMC Officers | Deputy Engineer and Junior Engineer of
Pune Municipal Corporation arrested by Pune Anti-Corruption in bribery case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा