Pune ACB Trap | 5 हजार रुपये लाच घेताना शिक्षण विभागातील महिला लेखाधिकाऱ्यासह एकजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सेवा पुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) पुणे शिक्षण विभागातील (Education Department) महिला वरिष्ठ लेखाधिकाऱ्यासह कनिष्ठ लेखाधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.20) केली. याप्रकरणी पुणे एसीबीने (Pune ACB Trap) लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला प्रभाकरराव गिरी Senior Accounts Officer Pramila Prabhakarrao Giri (वय-38), कनिष्ठ लेखाधिकारी अनिल श्रीधर लोंढे Junior Accounts Officer Anil Sridhar Londhe (वय-57) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. याबाबत एका शिक्षकाने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार हे शिक्षक असून त्यांच्या सेवा पुस्तकावर सहाव्या (6th Pay Commission) व सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) वेतन निश्चितीची पडताळणी करुन देण्यासाठी वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला गिरी यांनी 6 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असात प्रमिला गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली.
तर कनिष्ठ लेखाधिकारी अनिल लोंढे यांनी लाचेच्या मागणीला मदत केल्याचे निष्पन्न झाले.
यावरून पथकाने सोमवारी सापळा रचला.
प्रमिला गिरी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना अनिल लोंढे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यानंतर प्रमिला गिरी यांना ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijayamala Pawar) करीत आहेत.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | One bribe of Rs 5,000 in the trap of Anti -Corruption with a female accountant in the education department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई 10 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा

Ashok Chavan | माझा घातपात घडवण्याचे कारस्थान, अशोक चव्हाणांची पोलिसांकडे तक्रार; राजकीय वर्तुळात खळबळ