Pune ACB Trap | पोस्टमार्टम नोट्स व इतर कागदपत्रे देण्यासाठी 50 हजाराची लाच मागणारा पिंपरी-चिंचवडमधील पोलीस अधिकारी (ASI) अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम नोट्स आणि इतर कागदपत्र देण्यासाठी 50 हजारांची लाच मागून 5 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) सहायक पोलीस उपनिरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) रंगेहात पकडले. ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) बुधवारी (दि. 25) करण्यात आली. विठ्ठल अंबाजी शिंगे ASI Vitthal Ambaji Shinge (वय – 57) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या एएसआयचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) केलेल्या या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune Bribe Case)

 

याबाबत 36 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि.25) तक्रार दिली.
विठ्ठल शिंगे हे चिंचवड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उप निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे.
तसेच भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम नोट्स (Post Mortem Note) व इतर कागदपत्रे (Documents) शिंगे यांच्याकडे मागितली.
त्यासाठी शिंगे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. (Pune ACB Trap)

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.
प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता शिंगे यांनी तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये घेण्याचे मान्य करुन अ‍ॅडव्हान्स (Advance) म्हणून 5 हजार मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये लाच घेताना पुणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शिंगे यांना रंगेहात पकडले.
त्यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (Prevention of Corruption Act) कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) करीत आहेत.
पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, म. पो. हवा. पोर्णिमा साका, पो. कॉ. रियाज शेख, चालक पो. कॉ. पांडुरंग माळी यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे.

 

Web Title :- Pune ACB Trap | Pimpri-Chinchwad police officer (ASI) caught red handed for soliciting bribe of Rs 50,000 for postmortem notes and other documents

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा