Pune ACB Trap | माहिती अधिकारात मागवलेली कागदपत्रे देण्यासाठी 942 रुपये लाचेची मागणी, तलाठी व कोतवाल यांच्यावर पुणे एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | माहिती अधिकारात (Right to Information) मागवलेले कागदपत्रे विनाशुल्क देण्यासाठी राज्य माहिती आयोगाचे (State Information Commission) आदेश आहेत. असे असताना मुळशी तालुक्यातील उरवडे येथील तलाठी संजय बाबुराव दाते (Talathi Sanjay Baburao Date) आणि कोतवाल अमित भंडलकर (Kotwal Amit Bhandalkar) यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) करुन तडजोडी अंती 942 रुपये लाच घेण्याचे मान्य केले. याप्रकरणी पुणे एसीबीने (Pune ACB Trap) दाते आणि भंडलकर यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तर तलाठी दाते यांना अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत 67 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी माहिती अधिकारात कागदपत्रे मागितली होती. माहिती अधिकारात मागवण्यात आलेली कागदपत्रे विनाशुल्क (Free of Charge) देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले आहेत. मात्र तलाठी संजय दाते यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 942 रुपये देण्याचे ठरले होते.

पुणे युनिटने 30 डिसेंबर 2022 आणि 2 जानेवारी 2023 रोजी पडताळणी केली असता,
तलाठी दाते यांनी कागदपत्रे देण्यासाठी 942 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तर कोतवाल अमित भंडलकर याने लाच घेण्याच्या मागणीस प्रोत्साहन दिले.
त्यानुसार दोघांवर पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तलाठी संजय दाते यांना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार (DySP Kranti Pawar) करीत आहेत.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | Pune ACB FIR against Talathi and Kotwal demanding Rs 942 bribe to provide documents sought by RTI

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे