Pune ACB Trap | तलाठ्यासाठी 35 हजार रुपये लाच मागणाऱ्या मदतनीसावर पुणे एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रावेत येथील सोसायटीच्या जागेची 7/12 उताऱ्यावर नोंद करण्यासाठी किवळे तलाठी कार्यालयातील (Kiwale Talathi Office) मदतनीस (Assistant) याने तलाठ्यासाठी 35 हजार रुपये लाच मागितल्या (Demanding a Bribe) प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. नितीन ढमाले (Nitin Dhamale) असे लाच मागणाऱ्या मदतनीसाचे नाव आहे. पुणे एसीबीने (Pune ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.7) केली.
याबाबत 33 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या रावेत येथील सोसायटीच्या जागेची 7/12 उताऱ्यावर नोंद करण्यासाठी किवळे तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. जागेची 7/12 उताऱ्यावर नोंद करण्यासाठी कार्यालयतील मदतनीस नितीन ढमाले याने तक्रारदार यांच्याकडे किवळे तलाठी यांच्यासाठी 35 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पुणे युनिटने प्राप्त तक्रारीची 26 डिसेंबर 2022 रोजी पडताळणी केली असता किवळे तलाठी कार्यालयातील मदतनीस नितीन ढमाले याने तक्रारदार यांच्याबरोबर चर्चा करुन किवळे तलाठी यांच्यासाठी 35 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी नितीन ढमाले याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे (Police Inspector Sandeep Varhade) करीत आहेत.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
Web Title :- Pune ACB Trap | Pune ACB FIR on helper who demanded Rs 35 thousand bribe for Talatha
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा
Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर