Pune ACB Trap | कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी 50 हजारच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’, प्रचंड खळबळ

पुणे : Pune ACB Trap | पोलीसनामा ऑनलाइन – 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील (Kondhwa Police) महिला पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहाय्यक निरीक्षक आणि पोलिस कर्मचार्‍यावर 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पुणे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune ACB Trap)

हर्षदा बाळासाहेब दगडे (API Harshada Balasaheb Dagde) असे महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्यासह पोलिस कर्मचारी अभिजीत विठ्ठल पालके (Abhijeet Vittal Palke) यांच्यावर 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियावर दाखल असलेल्या गुन्हयाच्या चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी तसेच तक्रारदार (फिर्यादी) यांच्या आई-वडिल आणि बहिणीला अटक न करण्यासाठी पोलिस कर्मचारी पालके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षदा दगडे यांच्यासाठी तडजोडीअंती 50 हजार रूपयाची मागणी केली. त्यास एपीआय दगडे यांनी लाच मागण्यासाठी मदत केली. त्यामुळे अ‍ॅन्टी करप्शनकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap)

कोंढवा पोलिस ठाण्यातील (Kondhwa Police Station) महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकावर आणि
कर्मचार्‍यावर 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापुर्वी देखील बर्‍याच वेळा कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून (ACB Pune) कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबाबत यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.

पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विजयमाला पवार
(ACP Vijaymala Pawar), पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar) ,
कर्मचारी वैभव गोसावी, रियाज शेख, पूजा डेरे, चालक दीपक दिवेकर, पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली
आहे.

Web Title :-  Pune ACB Trap | Pune ACB Trap API Harshada Balasaheb Dagde PC Abhijeet Vittal Palke Bribe Of 50 Thousands