Pune ACB Trap | 1,10,000 ची लाच मागणारा लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) थांबवण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये लाच मागून 10 हजार रुपये लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) पोलीस कॉन्स्टेबल शिरीष आप्पासाहेब कामठे (Police Constable Shirish Appasaheb Kamthe) याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) रंगेहाथ पकडले. पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे (वय – 36) यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई शनिवारी (दि.4) केली. (Pune ACB Trap)

 

याबाबत 52 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने अतिक्रमण (Encroachment) केले. तक्रारदार यांच्या जागेत सुरु असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे याने एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता कामठे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कामठे याने एक लाख दहा हजार रुपये मागणी करुन त्यातील 10 हजार रुपये स्विकारताना पुणे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijaymala Pawar), पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Inspector of Police Shriram Shinde), पोलीस शिपाई महाशब्दे, महिला पोलीस शिपाई साका, चालक पोलीस हवालदार देसाई यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | Pune Lonikand Police Station Police in ACB Trap while demanding bribe of 1,10,000

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा