Pune ACB Trap | पुरंदर : लाच प्रकरणी महिला तलाठयासह दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) चांबळी तलाठी कार्यालयामधील (Chambli Talathi Office) महिला तलाठयासह एका खाजगी व्यक्तीला पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने अटक केली आहे (Pune Bribe Case). 2 हजार रूपयाच्या लाचेचे हे प्रकरण आहे. (Pune ACB Trap)

निलम मानसिंग देशमुख Neelam Mansingh Deshmukh (32, तलाठी, सजा-चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि खाजगी व्यक्ती नारायण दत्तात्रय शेंडकर Narayan Dattatraya Shendkar (50) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत (Pune Crime News). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या आईचे जानेवारी 2023 मध्ये निधन झाले आहे. त्यांचे 7/12 उतार्‍यावरून नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराने चांबळीच्या तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी त्यांच्याकडे 2 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. (Pune ACB Trap)

तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक तलाठी निलम देशमुख यांनी तक्रारदाराने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. देशमुख यांनी त्यांचा मदतनीस नारायण शेंडकर करवी 2 हजार रूपयाची लाच घेतली.
लाच प्रकरणी निलम देशमुख आणि नारायण शेंडकर यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याविरूध्द पुणे ग्रामीण पोलिस दलातील (Pune Rural Police) सासवड पोलिस ठाण्यात
(Saswad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्योती पाटील (PI Joyti Patil) करीत आहेत.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Web Title :-   Pune ACB Trap | Purandar: Anti-corruption arrested two people including woman Talathi neelam mansingh deshmukh in bribery case
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Benefits of Millet | चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया !

Ajit Pawar | ‘अशोक चव्हाण भाजपत जाणार’, शिरसाट यांच्या दाव्यावरुन अजित पवारांचा टोला, म्हणाले-‘पिंजऱ्यातील पोपटाने…’

Pune ACB Trap | 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा