Pune ACB Trap | पॅरोलवर असलेल्या कैद्याकडून लाच घेणे पडले महागात, येरवडा कारागृहातील हवालदारासह महिलेला अटक

पुणे : Pune ACB Trap | संचित रजेवर (पॅरोल – Paroll) असलेल्या कैद्यांकडून ५० हजारांची लाच मागितली व त्यापैकी १५ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) हवालदारासह एका महिलेला रंगेहाथ पकडले. हवालदार बाजीराव ज्योतीबा पाटील Bajirao Jyotiba Patil (वय ५४) आणि रेहाना आसिफ सय्यद Rehana Asif Syed (वय ४८) अशी त्यांची नावे आहेत. रेहाना सय्यद या कारागृह आवारातील कॅन्टीनमधील महिला कर्मचारी आहेत. (Pune ACB Trap)

याबाबत एका कैद्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार कैद्याची संचित रजा मंजूर करण्यात आली असून सध्या तो कारागृहाबाहेर आहे. खुल्या कारागृहात हा कैदी शिक्षा भोगत आहे. हवालदार बाजीराव पाटील याने कैद्याला ५० हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास त्याच्याविरुद्ध गैरवर्तणूकीचा अहवाल पाठवून त्यास खुल्या कारागृहातून (Yerwada Open Jail) मध्यवर्ती कारागृहात पाठविले जाईल, अशी धमकी दिली. (Pune ACB Trap)

या कैद्याच्या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कैद्याकडून शेख यांनी रक्कम स्वीकारताच त्यांना व हवालदार पाटील यांना पकडले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Superintendent of Police Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव
(Additional Superintendent of Police Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे (Deputy Superintendent of Police Sheetal Ghogare) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune ACB Trap | Taking a bribe from a paroled prisoner was expensive, a woman was arrested along with a constable from Yerawada Jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Crime News | खळबळजनक! मुंबई-गोवा महामार्गावरील फार्म हाऊसजवळ ऑडीत आढळला मृतदेह