पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | आजोबांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची सातबारा सदरी नोंद करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) खेड तालुक्यातील (Khed Taluka) टोकावडे येथील तलाठ्याला (Talathi) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुजित सुधाकर अमोलिक Sujit Sudhakar Amolik (वय-50) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागने ही कारवाई मंगळवारी (दि.7) केली आहे. (Pune ACB Trap)
याबाबत 26 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) सोमवारी (दि.6) तक्रार दिली. तक्रारदार यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची सातबारा सदरी नोंद करण्यासाठी तलाठी सुजित अमोलक यांनी 5 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 4 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी अमोलक यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीमध्ये 4 हजार रुपये लाच स्विकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 4 हजार रुपये लाच घेताना तालाठी सुजित अमोलक याला रंगेहाथ पकण्यात आले. याबाबत खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती पाटील (Police Inspector Jyoti Patil) करीत आहेत.
Web Title :- Pune ACB Trap | Talathi Cought While Taking Bribe Of Four Thousands Pune ACB Trap
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या