Pune ACB Trap | ठेकेदाराकडून 10 हजार रुपये लाच घेताना वनपरिमंडळ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शिक्रापूर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – झाडे तोडण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून (Contractor) लाकडांची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन तो सोडण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) शिक्रापूर वनपरिमंडळ कार्यालयातील (Shikrapur Forest Division Office) अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Pune ACB Trap) रंगेहाथ पकडले. प्रविण अर्जुन क्षीरसागर Pravin Arjun Kshirsagar (वय-40) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या वनपरिमंडळ अधिकाऱ्याचे (Forest Divisional Officer) नाव आहे. पुणे एसीबीच्या युनिटने (Pune ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.13) केली.

याबाबत ठेकेदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी ठेका घेतलेली झाडे तोडून तिची टेम्पोने वाहतूक करतात. वनपरिमंडळ अधिकारी प्रविण क्षीरसागर यांनी तक्रारदार यांचा टेम्पो ताब्यात घेतला होता. टेम्पो सोडण्यासाठी आणि पुन्हा कारवाई न करण्यासाठी क्षीरसागर यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, वनपरिमंडळ अधिकारी प्रविण क्षीरसागर यांनी तक्रारदार यांचा ताब्यात घेतलेला टेम्पो सोडण्यासाठी आणि पुन्हा कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये स्विकारताना प्रविण क्षीरसागर यांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत
(Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक भरत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe) करीत आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे
(Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

Web Title :- Pune ACB Trap | While accepting a bribe of 10 thousand rupees from the contractor, the forest department officer in the net of anti-corruption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा