पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कार्यालयाचे ऑडिट (Audit) केल्याच्या मोबदल्यात ऑडिटर यांना देण्यासाठी चार हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) पुणे जिल्हा परिषद (Pune Zilla Parishad) अंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भोर च्या महिला पर्यवेक्षिका यांना पुणे एसीबीच्या (Pune ACB Trap) पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने (Pune ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.17) केली.
विद्या गजानन सोनवणे Vidya Gajanan Sonwane (वय- 49) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पर्यवेक्षिकेचे (Supervision) नाव आहे. याबाबत 54 वर्षाच्या महिलेने 13 जानेवारी रोजी पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार महिला या विद्या सोनवणे यांच्या कार्यालयात काम करतात. विद्या सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे कार्यालयाचे झालेल्या ऑडिच्या अनुषंगाने ऑडिटर यांना देण्यासाठी चार हजार रुपये लाच मागितली. याबाबत महिलेने पुणे एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता विद्या सोनवणे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना सोनवणे यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे (Police Inspector Sandeep Varhade),
पोलीस अंमलदार मुकुंद अयाचित. सरिता वेताळ, चालक जाधव यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune ACB Trap | Women supervisor of Integrated Child Development Service Yojana project caught in anti-corruption net while taking bribe of Rs.4,000
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो