‘त्या’ ९ जीवलग मित्रांनी ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ असं म्हटलं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शुक्रवारी मध्यरात्री पावने एकच्या सुमारास सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव इर्टिका गाडी आणि ट्रकचा हा अपघात होता. या अपघातात अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलाणी या नऊ तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणारा हा अपघात होता. या मधील शुभम भिसे सोडला तर सर्व वर्गमित्र होते. काही वर्षांपूर्वी ही मुलं यवतमधील विद्या विकास मंदीर शाळेत एकत्रित शिकत होते.

शाळेत असताना यांच्यात घट्ट मैत्री होती. शाळेत असतानाही हे सर्व एकत्रित असायचे. शाळा संपल्यानंतरही यांनी आपल्या मैत्रीत दुरावा निर्माण होऊ दिला नाही. प्रत्येकाच्या मैत्रीमध्ये सर्व अणाभाका खात असतात की ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे, अपनी दोस्ती जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी वैगरे, या मैत्रीच्या अणाभाका या मित्रांनी पाळल्या असंच म्हणावसं वाटते.

शाळेनंतर सर्व मित्र आपापल्या पुढील शिक्षणात आणि कामात व्यस्त होते. सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी ते एकमेकांच्या संपर्कात होते. एकमेकांबद्दल सर्व माहिती ठेवत होते. पावसाळा आणि ट्रिप हे त्यांचे गणित जुळालं. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जाण्याचे ठरले. गुरुवारी सकाळी रायगड किल्ल्यावर जाण्याचे पक्क झालं. आठ जण सकाळी आठ वाजता लोणीला पोहचले. एका मित्राला तेथून घेतले, आणि सफारीसाठी निघाले. दोन दिवस मौजमजा केली. पण नियतीला त्यांचा आनंद पाहवला नाही आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. आणि या मित्रांना मृत्यूने आपल्या कवेत घेत त्यांचे आयुष्य संपवले.

आरोग्यविषयक वृत्त