Pune Accident | पुण्यात दुर्दैवी घटना; ट्रॉलीच्या खाली येऊन गरोदर महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव (Narayangao) परिसरातील वारुळवाडी येथे एक भीषण अपघात (Pune Accident) झाला असून या अपघातात एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. उसाच्या ट्रॉलीखाली सापडून या गरोदर महिलेचा (Pregnent Women) मृत्यू झाला. या घटनेनंतर (Pune Accident) मृत महिलेच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेचे वय २२ वर्ष होते.

 

उसाने भरलेले दोन ट्रॉली (Tractor Trolly) घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून (Pune Accident) या महिलेचा मृत्यू झाला. तसेच गर्भाशयातील अभ्रकाचा (Unborn Baby) ही सदर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेची तक्रार मृत महिलेचे पतीने केली असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोरक्ष सुखदेव ढेबरे, असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्याला असणाऱ्या कडांवर दुचाकी घसरून अनेक अपघात होत आहेत. ६ महिन्यांपूर्वी देखील या परिसरात अशीच एक घटना घडली होती. त्यामुळे अजून किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

सदर महिला जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील रहिवाशी होत्या.
आपल्या पती आणि आईसोबत नारायणगाव येथे उपचारासाठी आल्या होत्या.
उपचारानंतर वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला आहे.
रस्त्यात गतिरोधक आला म्हणून त्या गाडीवरून खाली उतरल्या.
मात्र समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का त्यांना लागला.
या धक्क्याने त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेले.
त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

Web Title :- Pune Accident | a 22 year old pregnant woman died on the spot in accident while going to the hospital with her husband

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | ‘पुन्हा एखादा OK मधी सगळं’??; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार

Rajkumar Rao-Shahnaz Gill | काय सांगता, खरच राजकुमार राव वडील होणार ?, शहनाज गिलसमोर केला मोठा खुलासा

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या जामिनाचा निकाल राखीव; काय होणार याकडे सर्वांची उत्सुकता