
Pune Accident | भरधाव ट्रकच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
पुणे / राजगुरुनगर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Accident | भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील एक 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू (Pune Accident) झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवार) सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik highway) चांडोली फाटा (Chandoli) येथे घडला.
अक्षय रामदास मुकणे Akshay Ramdas Mukne (वय – 25 रा. चांडोली, तापकीरवस्ती ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. खेड पोलिसांनी (Khed police) दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकची धडक रस्त्यावरील कारला बसली. तसेच दुचाकीला पाठीमागच्या बाजुने जोरदार धडक दिली.
ट्रकच्या धडकेत दुचाकी 50 फूटापर्यंत फरफटत नेली.
यामध्ये दुचाकीवरील अक्षय मुकणे याच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर वसंत वाघ (रा. चांडोली) हा गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ट्रक खाली अडकलेली दुचाकी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Accident | A 25-year-old man died on the spot and another was seriously injured in a truck collision
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | देव तरी त्याला कोण मारी ! पुण्यात आईनेच पोटच्या बाळाला फेकले ओढ्यात, मात्र बाळ ‘सुखरुप’
Pune Court | शपथपत्रात लपविले उत्पन्नाचे स्रोत, न्यायालयाने अंतरिम पोटगी व इतर खर्चाची मागणी नाकारली