Pune Accident | भाजीपाला घेऊन जाणार्‍या रिक्षाचालकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक रिक्षाला बसून झालेल्या अपघातात (Pune Accident) रिक्षा चालकाचा मृत्यू (Rickshaw driver Death) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Accident) कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि.26) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. आशिष तानाजी खवले Ashish Tanaji Khawale (वय-32 रा. मुपो. वेळु ता. भोर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

याप्रकरणी चिन्मय नितीन पजई (वय-25 रा. फ्लॅट नं. 12 वैष्णवी अपार्टमेंट, मोदी गणपतीजवळ, नारायण पेठ) याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर ऋषिकेश तानाजी खवले (वय-26) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षातील सहप्रवासी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खवले यांचा भाजी विक्रीचा (selling vegetable) व्यवसाय
असून भोर तालुक्यातील वेळू गावातून ते मार्केटयार्डातील (marketyard) घाऊक बाजारात भाजी
विक्रीस पाठवितात. गुरुवारी पहाटे आशिष, ऋषीकेश आणि मित्र सागर पहाटे साडेतीनच्या सुमारास
रिक्षातून भाजीपाला घेऊन मार्केटयार्डात निघाले होते. त्यावेळी कात्रज घाट (Katraj Ghat) उतरल्यानंतर मांगडेवाडी (Mangdewadi) परिसरात समोरुन भरधाव वेगाने आलेला दुचाकीस्वार रिक्षावर आदळला. अपघातात रिक्षाचालक आशिष खवले, ऋषीकेश, मित्र सागर जखमी झाले तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वीच रिक्षाचालक आशिष खवलेचा मृत्यू झाला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Narayan Rane | दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार – नारायण राणे

Pune Crime | बांधकाम व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने लाखोची फसवणूक, बांधकाम व्यावसायिकावर FIR

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Accident | A rickshaw puller carrying vegetables died in a two-wheeler collision

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update