Pune Accident |  हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात 

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident |  उरुळी देवाची हद्दीत सासवड रोडवर शिवशाही एसटी बस (Shivshahi ST Bus) आणि कंटेनरची (Container) धडक झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात (Pune Accident)  रविवारी (दि.18) मध्यरात्री 12:29 वाजता सासवड रस्ता (Saswad Road), ऊरळी देवाची, हॉटेल सोनाई जवळ झाला. अपघातात काही जण जखमी असून गाडीमधे अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर  काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्रातील (Kaleborate City Fire Station) जवान घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्ती कंटेनर चालक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड (Anil Gaikwad) यांनी नियंत्रण कक्षास कळविले की, या ठिकाणी शिवशाही बस (MH14 GO 3104) पंढरपुर-स्वारगेट व कंटेनर (MH18 AA 7190) यांचा मोठा अपघात झाला असून दलाची मदत पोहोचण्यापूर्वी शिवशाही बसमधील 4 जखमींना नागरिकांनी बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले होते. तर कंटेनर ड्रायव्हर याला देखील रुग्णालयात दाखल केले.

दलाच्या जवानांनी पाहणी केली असता शिवशाही बसमधे ड्रायव्हर सीटमागे एक जखमी व्यक्ती अडकला होता.
तात्काळ अग्निशमन उपकरण फायर एक्स वापरत पाचच मिनिटात सीटवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले.
घटनास्थळी क्रेनच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली.
अपघाताचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

घटनास्थळी एकूण जखमी व्यक्ती 6 असून काळेबोराटे नगर, कोंढवा बुद्रुक व अग्निशमन मुख्यालय येथील रेस्क्यु व्हॅन अशी 3 अग्निशमन वाहने वेळेत दाखल झाली होती.
अपघाताचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title :- Pune Accident | Horrible accident involving container and Shivshahi bus on Hadapsar-Saswad road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विमाननगर परिसरातील घटना

Osmanabad Crime | विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या

Narayan Rane On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर नारायण राणे म्हणाले – ‘यावर कोर्टातून निकाल…’

Nana Patole | नाना पटोलेंची थेट PM मोदींवर टीका, म्हणाले – ‘कोरोनात ताट वाजवायला लावले आणि देशात अवदसा…’