Pune Accident | पत्नीचा डोळ्यासमोरील अपघाती मृत्यू सहन न करू शकल्याने पतीने केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव (Narayangao) परिसरातील वारुळवाडी येथे एक भीषण अपघात (Pune Accident) झाला होता. या अपघातात एका २२ वर्षीय गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. उसाच्या ट्रॉलीखाली सापडून या गरोदर महिलेचा (Pregnent Women) मृत्यू झाला होता. या घटनेनंतर (Pune Accident) मृत महिलेच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

 

पण, ही दुःखद खबर इथेच संपली नाही. ही घटना तिच्या पतीने डोळ्यादेखत पहिली होती. त्यामुळे तो स्वतःला सावरु शकला नाही आणि त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी गर्भवती महिला, तिची सासू आणि तिचा पती दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. रस्त्यावर गतिरोधक असल्यामुळे गर्भवती महिला गाडीवरून खाली उतरली होती. त्यावेळी समोरुन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्यामुळे ती खाली पडली आणि तिच्या डोक्यावरुन ट्रॅक्टरचे चाक गेले. त्यामुळे या अपघातात (Pune Accident) तिचा आणि पोटातील बाळाचा जागीच मृत्यू झाला.

 

पत्नीच्या अचानक डोळ्यासमोर मृत्युमुखी पडण्याने पती प्रचंड दु:खी झाला होता आणि त्याने स्वतःचे आयुष्य संपवले.
रमेश नवनाथ कानसकर (Ramesh Navnath Kanaskar) (वय २९, राहणार धोंडकरवाडी , निमदरी ता.जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
तर त्याच्या पत्नीचे नाव विद्या (Vidya) असे होते. दोघांचे लग्न फक्त ८ महिन्यापूर्वी झाले होते.

 

Web Title :- Pune Accident | maharashtra pune accident pregnant wife dies husband ends life in bereavement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

Rahul Gandhi | ‘ते घाबरत नसते, तर त्यांनी कधीच या पत्रावर सही केली नसती’; राहुल गांधींची सावरकरांवर पुन्हा टीका

Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत