Pune News : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हडपसर येथील शेवाळेवाडी फाटा परिसरात अपघाताची घटना घडली आहे. नागसेन विश्वंबर नागटिळक (वय 44, रा. बी. टी. कवडे रोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी चालक अनिल मांढरे (वय 51, रा. महादेवनगर, मांजरी ) याला अटक केली आहे. याबाबत केतन सवाणे (वय 23) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागसेन एका खासगी कंपनीत नोकरीस होते. रविवारी सकाळी ते दुचाकीवरून शेवाळेवाडी फाटा परिसरातून थेउरकडे जात होेते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कार चालकाने त्यांना जोरात धडक दिली. यात ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. पोलिसांनी शोध घेऊन चालक अनिल याला अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.