Pune Accident News | नगर -कल्याण महामार्गावर तिहेरी अपघातात ८ जण ठार; एकाच कुटुंबावर घाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Accident News | नगर -कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ पिकअप, रिक्षा आणि ट्रक यांच्या झालेल्या तिहेरी अपघातात (Pune Accident News) ८ जण ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री ११ वाजता घडला. अपघातात दोन मुले, एक महिलेचा समावेश आहे.

गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५), हर्षद मस्करे (वय ४) आणि काव्या मस्करे (वय ६, सर्व रा. मढ) अशी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु झाला आहे.

रिक्षाचालक नरेश नामदेव दिवटे (वय ६६, रा. पेडे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि हमाल अमोल मुकुंदा ठोखे (रा. जालना) यांचाही या अपघातात जागीच मृत्यु झाला.

भाजीपाला व्यवसाय करणारे मस्करे हे पत्नी व दोन लहान मुलांना घेऊन पीकअप घेऊन जात होते. पिकअप ओतूरकडून कल्याणकडे जात असताना त्याने समोरुन आलेल्या रिक्षाला धडक दिली. या धडकेनंतर पिकअप तसाच पुढे गेला व रिक्षाच्या मागून आलेल्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात (Pune Accident News) पिकअपमधील पाच जण आणि रिक्षामधील रिक्षाचालक व दोन प्रवासी यांचा मृत्यु झाला. दोघा प्रवाशांची अद्याप ओळख पटली नव्हती.

अपघाताची माहिती मिळाल्यावर ओतूर पोलीस ठाण्याचे (Otur Police Station) सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे
(API Sachin Kandge) व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. आठही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी
ओतूर रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

प्लॉट देण्याच्या बहाण्याने 17 लाखांची फसवणूक, व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर FIR

काळ्या जादूने स्पर्धा परिक्षेत यश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; पाषाण परिसरातील प्रकार (व्हिडीओ)

तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भवानी पेठेतील घटना

पाण्याची बाटली आणण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार, पिंपरी चिंचवडमधील घटना

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा सपासप वार करुन खून, चाकण परिसरातील घटना

वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या शुभम भोसले टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 102 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA