Pune Accident News | राँग साईडने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, पुण्यातील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगात राँग साईडने आलेल्या कारची धडक दुचाकीला बसून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात (Pune Accident News) पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर (Saswad-Kapurhol Road) असणाऱ्या नारायणपूर येथे शुक्रवारी (दि.2) सकाळी नऊच्या सुमारास झाला. या अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
शिवाजी पोमण (वय-40) व भीमराव लक्ष्मण कांबळे (वय-65 दोघे रा. पोखर, ता. पुरंदर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एर्टिगा मोटारीवरील चालक वरद विकास खंडागळे (वय-20 रा. पंढरपूर जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबतकृष्णा चंद्रकांत पोमण (वय-23) यांनी तक्रार दिली आहे. शिवाजी पोमण हे नारायणपूर ग्रामपंचायतीचे (Narayanpur Gram Panchayat) माजी सदस्य आहेत. (Pune Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शेटेमळा-सासवड गावच्या हद्दीत नारायणपूर ते सासवड
रोडवर एर्टीगा Ertiga (एमएच 13 डीई 5468) आणि दुचाकी (एमएच 12 बीआर 9968) या वाहनांची
समोरासमोर धडक झाली. यामध्ये पोमण आणि कांबळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कार चालक राँग साईडने येत असल्याने हा अपघात झाला.
पोमण आणि कांबळे हे दुचाकीवरुन सासवडकडून नारायणपूरकडे निघाले होते.
त्यावेळी कार चालक स्वत:ची लेन सोडून विरुद्ध लेनमध्ये घुसला. वेगात असलेल्या कारची धडक दुचाकीला बसली.
यामध्ये दुचाकीवरील दोघे फेकले जाऊन डांबरी रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Accident News | A car coming from the wrong side collided with a two-wheeler, two died on the spot in a horrific accident in Pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी