Pune Accident News | हडपसरमध्ये भीषण अपघात ! मिक्सर कंटेनरने 4 रिक्षा आणि कारला दिली धडक; 1 ठार तर 3 जखमी

पुणे : Pune Accident News | भरधाव जाणार्‍या एका मिक्सर कंटेनरने हडपसर (Hadapsar) येथे एका पाठोपाठ चार रिक्षा आणि एका कारला धडक दिली असून त्यानंतर तो झाडाला धडकून उलटला आहे. हे झाड एका नागरिकाच्या अंगावर पडले. या अपघातात १ जण जागीच ठार झाला असून ३ जण जखमी झाले आहे. हा अपघात हडपसर येथील गाडीतळाजवळ सकाळी ६ वाजता घडला. (Pune Accident News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिक्सर कंटेनर हा सोलापूर रोडने हडपसर येथील गाडीतळाजवळ आला. त्यावेळी एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे असलेल्या ४ ते ५ रिक्षांना एका पाठोपाठ धडक दिली. एका कारला धडक दिल्यानंतर हा कंटेनर एका झाडाला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की धडकेमुळे झाड कोसळले. कंटेनर उलटला. त्याखाली एक रिक्षा सापडून तिचा चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला असून  इतर तिघे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title :- Pune Accident News | A terrible accident in Hadapsar! Mixer container hit 4 rickshaws and a car; 1 killed and 3 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | ‘लोन ॲप’ प्रकरणात पुण्याच्या सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बंगळुरूच्या कॉल सेंटरमधील 9 जणांना अटक

Pune PMC News | येवलेवाडीतील बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई; बेकायदा प्लॉटींग आणि बांधकामांना नोटीसा

Maharashtra Police | तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ते झाले पोलीस उपनिरीक्षक; 44 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

Dasara Melava 2022 | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंचे भाषण होणार?, शिंदे गटाच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितलं