Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि जीमध्ये झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जाणांचा जागीच मृत्यू (Death In Accident) झाला. तर पाच जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.1 डिसेंबर) पहाटेच्या पाचच्या सुमारास मंचर जवळ झाला आहे. (Pune Accident News)

सटाणा तालुक्यातील सायखेडा येथून पण्याकडे चाललेल्या क्रूझर वाहनाने आज (शुक्रवार) पाहाटे पाचच्या सुमारास
दाट धुक्यामुळे पुढील अंदाज न आल्यामुळे ट्रकला पाठिमागून जोरदार धडक दिली.
यामध्ये चालक पंकज खंडु जगताप (वय-36), मधुकर तुकाराम अहिरे (वय-52), शांताराम संभाजी अहिरे
(वय- 50 सर्व रा. जायखेडा, ता. सटाणा) या तिघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर इतर जखमींना
मंचर उपजिल्हा रुग्णालयात (Manchar Upazila Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजेंद्र हिले व पोलीस कॉन्स्टेबल मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेऊन
इतर वाहनांना रस्ता मोकळा करुन दिला. (Pune Accident News)

धुके अधिक असल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्यामुळे वाहन चालकाला गाडीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
क्रुझ्ररचा पुढचा संपूर्ण भाग ट्रकच्या मागच्या बाजूस शिरल्याने पुढे बसलेल्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
त्यात पाच जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचाNarayan Rane | राणे पत्रकारांवरच भडकले, कोण आहे जरांगे पाटील? मी ओळखत नाही, कशाला सतत नाव घेता…Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनकPraful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटनाPune Crime News | आत्महत्या करण्यापुर्वी बनवला व्हिडीओ अन् इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या, कोंढवा परिसरातील घटना