Pune Accident News | गिरवली येथे भीमाशंकर-कल्याण बसला अपघात; पाच प्रवासी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | गिरवली येथे अपघात (Pune Accident News) घडला असल्याची माहिती समोर आली आहे. भीमाशंकर-कल्याण बसला (Bhimashankar-Kalyan Bus) अपघात झाला आहे. त्यामध्ये ही बस उलटली आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी (35 Passengers) असल्याचे बोलले जात. या अपघातात पाच प्रवासी जखमी (Injured) झाले आहेत. त्यांच्यावर घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (Ghodegaon Rural Hospital) उपचार करण्यात येत आहे. इतर प्रवासी सुखरूप आहेत.

 

जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) मिळालेल्या माहितीनुसार, गिरवली येथे बस उलटल्याची माहिती 108 नियंत्रण कक्षाला दूरध्वनीद्वारे मिळाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तातडीने 5 रुग्णवाहिका (5 Ambulance) अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बस अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

 

Web Title :  Pune Accident News | bhimashankar to kalyan bus accident at girvali

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा