Pune Accident News | कात्रज घाटामध्ये दुचाकी आणि एसटी बसचा भीषण अपघात, एकचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | कात्रज घाटामध्ये (Katraj Ghat) दुचाकी आणि एसटी बसच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार (Pune Accident News) सुरु आहेत. अमोल टकले Amol Takale (वय-18 रा. भवानी पेठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून पवन सुभाष जाधव (Pawan Subhash Jadhav) हा गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी कात्रज घाट उतरत होती तर एसटी बस घाट चढत होती.
त्यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे (Pune Accident News) कात्रज चौकाकडून जुन्या बोगद्याकडे जाणारी वाहतूक काहीवेळ खोळांबली होती.

 

मृत अमोल टकले आणि जखमी पवन जाधव हे खेड शिवापूर कडून पुण्याच्या दिशेने येत होते.
तर एसटी बस कोल्हापूरच्या दिशेने जात होती.
कात्रज घाटातील भिलारवाडीजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अमोल याचा जागीच मृत्यू झाला.

 

Web Title :- Pune Accident News | fatal accident involving st bus and two wheeler in katraj ghat one person died on the spot and 1 critical

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

Sudhir Suri | शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, एका संशयित हल्लेखोराला अटक