Pune Accident News | कार्तिकी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना वाहनाची धडक, तरुण वारकऱ्याचा मृत्यू; दौंडज खिंडीतील घटना

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | कार्तिकी वारीसाठी (Kartiki Wari) पंढरपूर हून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या पीकअपने (एम एच 14 जियु 5045) जोरात धडक दिली. यामध्ये एका तरुण वारकऱ्याचा गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात (Pune Accident News) जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून (Daundaj Khind) मार्गस्थ होतना पहाटे साडे चारच्या सुमारास झाला. श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा दौंडज खिंडीतून मार्गस्थ होत असताना हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर हून आळंदी कडे वारकऱ्यांची दिंडी जात होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंडज खिंडीत काही वारकरी टँकरच्या नळावर हात पाय धुण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाची चार वारकऱ्यांना धडक बसली.

या अपघातात (Pune Accident News) कृष्णा नागोराव गरुड ( वय 23 रा. मटकर आळा ता. जिल्हा परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सिधेशोर प्रभाकर बोबडे (वय 23 रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी), रितेश राजाराम ब्रम्हे (वय 18 रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी), चक्रधर कोपलवर (वय 28 रा. साडेगाव ता. जि. परभणी) हे तिघे जखमी झाले आहेत. या जखमींवर पुण्यातील ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital) येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

याप्रकरणी पीकअप वाहन चालक निलेश बाळासाहेब जगताप (वय 35 रा.कोथळे, ता. पुरंदर)
याच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात (Jejuri Police Station) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर (PI Bapusaheb Sandbhor) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड