Pune Accident News | एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात, पाच विद्यार्थी गंभीर जखमी; चांदणी चौकातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाने (Student Rickshaw) डंपरला धडक दिली. यामध्ये पाच विद्यार्थी गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्याची घटना मंगळवारी (दि.12) चांदणी चौकात (Chandni Chowk) दुपारी साडेबाराच्या सुमारास (Pune Accident News) घडली आहे. जखमी झालेले सर्व विद्यार्थी एमआयटी प्री स्कूलचे (MIT Preschool) आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई बेंगळुरु महामर्गावरुन (Mumbai Bangalore Highway) जात होती. त्यावेळी भरधाव वेगात असलेली रिक्षा भुयारी मार्गात डंपरला जाऊन धडकली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Pune Accident News) झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले. जखमी पैकी चार मुली एशियन हॉस्पिटलमध्ये (Asian Hospital) तर एक मुलगा चेलाराम हॉस्पिटलमध्ये (Chelaram Hospital) दाखल आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. हे सर्व केजी चे विद्यार्थी आहेत. नुकताच वाघोली येथे स्कूल बसचा अपघात झाला होता. त्यानंतर आज चांदणी चौकात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

ACB Trap News | कोर्टातील क्लार्कसाठी 50 हजार मागितले, 20 हजार लाच स्वीकारताना वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात