Pune Accident News | दिवे घाटात भीषण अपघात, अनेक वाहनांना धडक देऊन टँकर दरीत कोसळला;  दोघांचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे सासवड मार्गावरील (Pune Saswad Road)  दिवे घाटात (Dive Ghat) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. दिवे घाटात टँकर दरीत कोसळून हा अपघात (Pune Accident News) झाला असून टँकरने काही दुचाकींना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, टँकरने काही गाड्यांना धडक देऊन थेट दरीत कोसळला. यात दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल (Pune Fire Brigade) दाखल झाले असून अपघातग्रस्त (Pune Accident News)  टँकर हा अ‍ॅसिडने (Acid) भरलेला असल्यामुळे अ‍ॅसिडची गळती सुरु झाली आहे. या अपघातग्रस्त (Pune Accident News) टँकर खाली किती जण अडकले आहेत. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. टँकर उचलल्या नंतर माहिती समजू शकणार आहे. अपघातग्रस्त टँकर सासवड वरुन हडपसरच्या दिशेने येत होता. शेवटच्या वळणावर उताराला असताना टँकरने वाहनांना धडक देत दरीत कोसळला.

 

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवत टँकर शेजारी असलेल्या दरीत कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यु टीम, अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी (Pune Police) दाखल झाले.
या घटनेत घटनास्थळी धडक दिलेली वाहने पडलेली असून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title :-  Pune Accident News | tanker accident into valley in dive ghat two people were killed on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Sudhir Mungantiwar | ‘अजित पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या  बाटल्या…’, सुधीर मुनगंटीवार यांचा खळबळजनक आरोप