Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका

पुणे : Pune Accident News | बंगलोर -मुंबई महामार्गावरील (Mumbai Bangalore Highway) नवीन कात्रज बोगदा (Katraj Tunnel Pune) ते वारजे (Warje Malwadi) या बाह्यवळण रस्त्यावर दरी पुलाजवळ (Daripul) मध्यरात्री पुन्हा एकदा अपघात झाला. साताराहून पुण्याकडे (Satara To Pune) येणारा ट्रेलर दरी पुलाजवळ उलटून त्यात चालक जखमी होऊन केबीनच्या सीटवर अडकला होता. अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी त्याची सुखरुप सुटका केली. (Pune Accident News)

साताऱ्याहून पुण्याकडे येणारा ट्रेलर मध्यरात्री ३ वाजून ३४ वाजता उलटला. त्यात पुढील केबिनमध्ये सीटवर चालक जखमी अवस्थेत अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या चालकाशी संवाद साधून धीर दिला. शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर या उपकरणांनी तसेच एका क्रेनच्या मदतीने जखमी चालकाला १५ मिनिटात बाहेर काढून लगेच उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले. (Pune Accident News)

या रस्त्यावरुन जाणार्‍या एका दुचाकीस्वाराने प्रथम हा अपघात पाहिला.
मदतीकरीता पुढे आला असताना त्या ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेत असल्याचे दिसल्यावर घाबरुन या दुचाकीस्वाराने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी दरी पुलावरुन खाली उडी मारली. काही वेळाने पुलाखालून आवाज आल्याने जवानांनी या दुचाकीस्वाराची सुटका केली.
या अपघातामुळे ट्रेलरमधील तेल रस्त्यावर पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दूर केला.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उमराटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे
तसेच तांडेल – शिवाजी मुजूमले व फायरमन शिवाजी आटोळे आणि मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे,
राजेंद्र भिलारे यांनी सहभाग घेतला. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल यांचे जवान ही मदतीकरिता दाखल झाले होते.
पोलीस व नागरिकांनी मदत केली.

Web Title :- Pune Accident News | Trailer overturned near Dari Bridge; The trapped driver was rescued by the pune fire brigade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलत पूवर्वत करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन हवेतच?

Shambhuraj Desai | “आमची हिंमत पाच महिन्यांपूर्वीच दाखवली”; संजय राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर