Pune Accident News | दुर्देवी ! दोन दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दुचाकींच्या भीषण अपघातात (Pune Accident News) दोन्ही दुचाकीवरील तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात पुण्यातील (Pune Accident News) वानवडी (wanowrie) परिसरातील भैरोबा नाला चौकातील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि.7) रात्री साडे आठच्या सुमारास झाला. मोहम्मद कैफ मोसीन शेख (वय-20 रा. सय्यद नगर, हडपसर), प्रसाद रामकृष्ण राजम (वय-26 रा. गल्ली नं. 5, शांतीनगर वानवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात (wanowrie police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन संभाजी पवार Sachin Sambhaji Pawar यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर महामार्गावरील (solapur highway) भैरोबानाला पोलीस चौकशी समोरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. मयत प्रसाद राजम हा त्याच्या केटीएम KTM (एमएच 12 क्युसी 4271) वरुन भरधाव वेगात जात होता. त्यावळी मोहम्मद शेख हे त्याच्या अ‍ॅक्सेस access (एमएच12 एसएन 7257) वरुन जात होते.

प्रसाद राजम याने भरधाव वेगात मोहम्मद शेख यांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी शेख यांनी उजवीकडे वळताना कोणताही इशारा दिला नाही.
त्यामुळे केटीएमची धडक अ‍ॅक्सेस गाडीला बसली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी होऊन शेख याचा जागीच मृत्यू झाला.
तर प्रसाद राजम याला रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Accident News | Unfortunate! Two two-wheeler crash, both died on the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DGP Sanjay Pandey | 190 सहाय्यक निरीक्षकांना (API) पोलिस निरीक्षकपदी (PI) बढती लवकरच, DGP संजय पांडे यांची Facebook Live मध्ये माहिती (व्हिडिओ)

Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला, लठ्ठपणा होईल कायमचा दूर; जाणून घ्या

Pune News | ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये नोंद झालेल्या 2 वर्ष दोन महिने वयाच्या शिवांशला अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा