Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या वानवडीत विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनवानवडीत विचित्र अपघातात Pune Accident News एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये साहित्य घेऊन घरी जात असताना चढाला ट्रॅक्टरचा स्पीड कमी झाल्यानंतर चालकाने अचानक घेअर बदला आणि ट्रॅक्टरला झटका बसला. त्यावेळी महिला खाली पडली आणि उतारावरचा ट्रॅक्टर मागे आल्याने त्याचे चाक महिलेच्या छातीवरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. pune accident news Unfortunately A woman died in accident in Pune s Wanwadi area

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

नंदा अशोक यादव (वय 45) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महावीर अर्जुन पटेकर (वय 52, रा. कडमवाक वस्ती) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हे तरवडे वस्ती येथे राहतात.
त्यांचे स्वत:चे घर आहे. दरम्यान पावसाळा आल्याने त्यांना घराच्या पार्किंगजवळ कोबा करायचा होता.
त्यामुळे ते काल सकाळी वाळू, विटा व इतर साहित्य घेण्यासाठी बाहेर पडले.
नंदा व त्यांचे पती हे साहित्य घेण्यासाठी हडपसर भागात गेले होते.
त्यांनी एका दुकानातून हे साहित्य घेतले.

त्यानंतर हे साहित्य घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी येथीलच ट्रॅक्टर भाड्याने घेतला.
यावेळी अशोक यादव यांनी पत्नी नंदा यांना तू ट्रॅक्टरमध्ये बसून घरी जा, मी पाठीमागून येतो असे म्हणाले.
त्यामुळे नंदा या ट्रॅक्टरमध्ये बसून जात होत्या.
त्या चालकाशेजारी बसून जात असताना मोटाई मंदीर रोडकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना चढावर अचानक ट्रॅक्टरचा स्पीड कमी झाला.
त्यामुळे घाईत चालकाने घेअर बदलला. त्यामुळे अचानक झटका बसला आणि त्या खाली पडल्या.
त्या खाली पडल्यानंतर चालक मागे बघत असताना ट्रॅक्टर पाठीमागे आला. यात नेमके चाक नंदा यांच्या छातीवरून गेले. येत त्याच्या बरगड्या तुटल्या आणि त्यात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक अहिवळे हे करत आहेत.

Web Titel : pune accident news Unfortunately A woman died in accident in Pune s Wanwadi area

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना