Pune News : भरधाव कारनं एका कारसह 2 दुचाकीस्वारांना उडवलं, तिघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरुद्ध दिशेने आलेल्या कार चालकाने एका कारसह दोन दुचाकीस्वारांना उडविल्याचा प्रकार घडला आहे. यात तिघे जखमी झाले आहेत. साधू वासवानी पुलावर हा अपघात मध्यरात्री घडला आहे. पोलिसांनी कार चालकाला अटक केली.

अभिषेक संजय नाफडे (वय ३५,रा. कोणार्क कॅम्पस, विमाननगर) याला अटक करण्यात आली. अपघातात संपत भोगे (वय ३४,रा. दत्तनगर, आंबेगाव खुर्द), संदीप तपेश्वर भगत (रा. वडगाव शेरी), अबु बखर शेख (रा. येवलेवाडी, कोंढवा) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार भोगे, भगत, शेख शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास साधू वासवानी पुलावरून निघाले होते. त्यावेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कार चालक अभिषेक याने प्रथम कारला आणि नंतर दोन दुचाकींना धडक दिली. यात तिघेही जखमी झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक भागवत शेंडगे तपास करत आहेत.