पुण्यात पोलीस जीपला भीषण अपघात, निरीक्षक आणि चालक जखमी, रुग्णालयात दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलिस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. शिवाजीनगर कृषी महाविद्यालयासमोरील ब्रिजवर हा अपघात झाला आहे. यात चालक आणि पोलीस निरीक्षक हे जखमी झाले आहेत.

 

राम राजमाने असे जखमी झालेल्या पोलीस निरीक्षाकांचे नाव आहे. तर त्यांचा चालकाचे नाव समजू शकले नाही. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राम राजमाने हे परिमंडळ एक मधील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक आहेत. दरम्यान आज सकाळी ते घरून पोलीस ठाण्यात येत होते. त्यावेळी कृषी महाविद्यालय समोरील ब्रिजवर चालकाचे नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकली. यात डिव्हायडर आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलीस निरीक्षक आणि त्याचा चालक यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पायाला मार लागला असल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती मिळताच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.