Pune Accident | दुर्दैवी ! बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) इंदापूर (Indapur) तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्या जवळ शुक्रवारी पहाटे बंदोबस्तासाठी निघालेल्या युवा पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू (Pune Accident) झाला. तर एक जण जखमी (Pune Accident) झाला आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलीस दलात आणि इंदापूर पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अक्षय बाळासाहेब साबळे Akshay Balasaheb Sable (वय २४, रा. नाशिक, सध्या रा.सोलापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र अक्षय उर्फ मुकेश विजयकांत दुमडे (वय २३, रा. सोलापूर) असे अपघातात गंभीर झाला आहे. याबाबतची फिर्याद अक्षय साबळे यांचे मित्र सिद्धेश्वर चंद्रशेखर हिरेमठ (रा. कल्यान नगर भाग 1, सोलापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय साबळे हे गुरुवारी रात्री त्यांचा मित्र अक्षय उर्फ मुकेश दुमडे याला भेटले.
त्यानंतर दोघेही दुचाकीवरून (क्र. एम एच २४ वाय ५५५ ) वरून सोलापूर येथून बंदोबस्तासाठी जात आहे असे सांगून निघून गेले होते.
शुक्रवारी (दि. २९) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अक्षय साबळे यांचा मित्र सिद्धेश्वर हिरेमठ यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातून फोन आला.
तुमचा मित्र अक्षय साबळे व मुकेश दुमडे यांचा अपघात झाला आहे.
त्यापैकी एक जण मयत (Pune Accident) झाला आहे. एक जण गंभीर आहे.
दरम्यान, हिरेमठ यांनी त्यांचे सहकारी मित्र आकाश तोगे, योगेश सरवदे, गंगाधर माळी यांना हि घटना सांगितली. सर्वजण इंदापूर मध्ये सकाळी पोहचले. अक्षय साबळे जबाबदारीने ड्युटी निभावत होते तसेच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्याच्या निधनाने पोलीस खात्यासह मित्रांनी दुःख व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान मन्नतवर पोहचला पण ‘या’ कारणामुळं मुनमुन धमेचा तुरूंगातच अडकली, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pune accident | solapur policeman Akshay Balasaheb Sable is died in road accident near indapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update