Pune Accident | पुण्यात दारुने भरलेला ट्रक पलटी; दारूचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Accident | बारामती पाटस महामार्गावर (Baramati Patas Highway) उंडवडी कडेपठार येथे दारुच्या बॉक्सने (Boxes of liquor) भरलेला ट्रक पलटी (Pune Accident) झाला आहे. ट्रक ड्राईव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पलटी झाला. पलटी झालेल्या ट्रकमध्ये 65 लाख रुपये किमतीचे 950 बॉक्स भरले होते. असं ट्रक ड्राईव्हर निलेश गोसावी (Driver Nilesh Gosavi) आणि किनर अंकुश बेंद्रे (Ankush Bendre) (रा. बारामती) यांनी सांगितलं आहे. या झालेल्या अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, तेथील स्थानिकांनी दारुचे बाॅक्स पळवले आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, बारामती तालुक्यातील पिंपळी कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगांव येथे निघाला होता.
पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना परिसरात पसरली.
नंतर येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या.
यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. पण, ड्रायव्हर व क्लिनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत (Pune Accident) केली नाही.
सकाळ पर्यंत लोकांनी दारु पळवण्यावर सपाटा लावला. याबाबत माहिती समजताच बारामती ग्रामीण पोलीसांनी (Baramati Rural Police) घटनास्थळी धाव घेतली.
इतक्यात लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पसार झाले.

 

दरम्यान, गाडी चालक निलेश गोसावी आणि किनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांनी दारु घेऊन जाऊ नये.
असं म्हटल्यावर चालकाला मारहाण केली गेली.
आणि लोकांनी गाडीची ताडपत्री हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु घेऊन गेले.
विशेष म्हणजे यात महिला ही सामील झाल्याची माहिती गाडी चालकाने सांगितली आहे.

 

Web Title : Pune Accident | truck overturned on Baramati Patas Highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना दणका ! हाय कोर्टानं समन्स रद्द करण्यास दिला नकार, केली ‘ही’ सूचना

Labour Ministry | कामगार मंत्रालयाने मजूरांच्या किमान वेतनात केली वाढ, 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवीन दर; जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ

Nawab Malik | नवाब मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा; म्हणाले – ‘होय, मी भंगारवाला, भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही’ (व्हिडिओ)