Pune Accident | स्कूल बसमधून पडून मदतनीस महिलेचा मृत्यू, शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident | पुणे शहरामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात (Pune Accident) चार जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. अपघाताच्या या घटना सोलापूर रस्ता (Solapur Road), नगर रस्ता (Nagar Road) आणि बालेवाडी (Balewadi) येथे घडल्या आहेत.

 

बालेवाडी येथे स्कूल बसमधून (School Bus) पडल्याने मदतनीस महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक नागनाथ विठ्ठलराव शाहू Nagnath Vitthalrao Shahu (वय-37 रा. बालेवाडी) याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सुरेखा राजेंद्र सुर्यवंशी Surekha Rajendra Suryavanshi (वय-33 रा. बालेवाडी) असे अपघातात (Pune Accident) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहेत. याबाबत अशोक गोविंद माने (वय-68 रा. माडज, ता. उमरगा) यांनी फिर्याद दिली आहे.

 

आरोपी हा शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर चालक म्हणून काम करतो. तर मयत सुरेखा या मदतनीस म्हणून काम करत होत्या. बालेवाडी येथील सैराट हॉटेलसमोर बसचालकाने भरधाव वेगात बस नेली. त्यावेळी दरवाजात उभ्या असलेल्या सुरेखा यांचा तोल जाऊन त्या बाहेर रस्त्यावर पडल्या. यामध्ये गंभीर झालेल्या सुरेखा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील (PSI Shamal Patil) करीत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावर ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
पुणे-सोलापूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाची धडक बसून एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शोभा ओव्हाळ (वय-65) असे मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांची बहिण शांता राजू वाघमारे (वय-65 रा. भोसरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. शोभा आणि शांता या दोन बहिणी रस्त्यावरुन पायी जात होत्या. मांजरीतील ग्राम प्रशिक्षण केंद्रासमोर भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाची धडक शोभा यांना बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन शोभा यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात (API Thorat) करीत आहेत.

 

दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
लोणीकाळभोर परिसरात एका भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक बसून पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
तात्याबा गायकवाड (वय-80 रा. लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याप्रकरणी दुचाकीस्वार शुभम दत्तात्रय महाडिक Shubham Dattatraya Mahadik (रा. शिंदवणे, ता. हवेली)
याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत गायकवाड यांचा मुलगा विलास गायकवाड याने फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे (PSI More) करीत आहेत.

नगर रोडवर फिरस्त्याचा मृत्यू
पुणे-नगर रोडवर वाघोली (Wagholi) येथे भरधाव वाहनाच्या धडकेत एका अनोळखी व्यकीचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून तो फिरस्ता असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी उमेश साबळे (Umesh Sable) यांनी फिर्याद दिली आहे.

 

Web Title :- Pune Accident | Woman helper dies after falling from school bus, four die in different accidents in the city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”