Pune : पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद ! विचित्र घटनेत ‘मनीष’चा जागीच मृत्यू, खडकी मध्ये FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात एका गुन्हेगाराचा आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद झाल्यानंतर घडलेल्या विचित्र घटनेत गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस सीसीटीव्हीची पडताळणी करत कारवाई करत आहेत.

मनीष काळूराम भोसले (वय 20, रा. बोपोडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी येथील आनंद नगर परिसरात मनीष राहतो. मनीष याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. त्याला दारूचे व्यसन आहे.

दरम्यान रेल्वे पोलीस दलातून निवृत्त झालेले 62 वर्षीय कर्मचारी आनंदनगर परिसरात डब्बा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी मनीष येथे होता. तो नशेत होता. यावेळी विनाकारण मनीष याने वाद घातला व त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्याने तो दारू पिला असल्याने त्याला एक चापट मारली व निघाले. पण, मनीष तसाच मागे येत असताना तो अचानक खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. यात त्याचा मृत्यू झाला असावा, असे वरिष्ठ निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी दिली.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यात हा घटना क्रम पोलिसांनी पडताळणी केला असून, त्यानुसार आता कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर खरे कारण समजेल असे सांगण्यात आले आहे.