जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

जमिनीच्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के.कऱ्हाडे जामिन फेटाळला.

संजय बंडोबा मालपोटे (रा. फळणे, ता. मावळ) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी अशोक बच्चू मालपोटे (वय 28), संतोष बच्चू मालपोटे (वय 23), अमोल ज्ञानेश्‍वर जगताप (वय 25, तिघेही, रा. फळणे, ता. मावळ) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. किरण दत्ता जगताप आणि इतर दोन अनोळखी व्यक्तीवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत सागर कैलास आसवले (वय 28, रा. टाकवे बु, ता. मावळ) याने फिर्याद दिली आहे. सोमनाथ लहु मालपोटे (रा. फळणे, ता. मावळ) हे जखमी झाले आहेत.

[amazon_link asins=’B01K4K6266′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f29359b1-9d69-11e8-9f89-4f60eac1fd8d’]
जखमी सोमनाथ आणि आरोपी भावकीतील आहेत. जमिनीवरून त्यांच्यात वाद होता. याच कारणावरून 23 मे 2018 रोजी फळणे गावच्या हद्दीत सर्व आरोपींनी मिळून सोमनाथ यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्‍यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी संजय याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला.
फरार साथीदारांच्या शोधासाठी, तसेच गुन्हात ओळख परेड घेणे बाकी आहे. तो जखमी सोमनाथ यांच्या शेजारी राहण्यास आहे. जामीन मिळाल्यास आणखी गुन्हा करण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही, असा युक्तीवाद अॅड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने संजय याचा जामीन फेटाळला.