Pune : पोलिस हवालदाराच्या खून प्रकरणी आरोपीला 15 मेपर्यंत पोलिस कोठडी, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाकूने वार करून पोलीस हवालदाराचा खून केल्या प्रकरणी फरासखाना पोलीसांनी अटक केलेल्या सराईताच्या पोलीस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रवीण महाजन (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. समीर सय्यद असे खून झालेल्या हवालदाराचे नाव आहे. ५ मे रोजी बुधवार पेठ परिसरात ही घटना घडली.

फरासखाना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रवीण याने समीर सय्यद यांच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर चाकुने वार करून खून केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने प्रवीण याना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेल्या चाकू बाबत त्याने माहिती दिली आहे. तसेच तपासा दरम्यान त्याने गुन्ह्याच्या ठिकाणी त्याची पत्नी आणि मित्रांसह असल्याचे सांगितले आहे. तसेच हा चाकू त्याने ज्या दुकानातून खरेदी केला त्या दुकानाच्या मालकाकडे तपास करायचा आहे. प्रवीण याची पत्नी गाझियाबाद येथील असल्याची माहिती मिळाल्याने गाझियाबाद येथे पथक गेले असता ती मिळून अली आहे. तिच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी, प्रवीण हा दोन वर्षाकरीत तडीपार असताना देखील पुण्यात येऊन त्याने खून केला आहे. त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करण्यासाठी, तसेच गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.