Pune : बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर, पीडित मुलीने दिला अर्भकास जन्म

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकाच भागात रहात असल्याने पीडित मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीच्या राहते घरी बोलावून तिचे इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संभोग करून तीस गरोदर ठेवले व पीडित मुलीने एक स्त्री अर्भकास जन्म दिल्याच्या फिर्यादीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीची २५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांनी दिले.

या प्रकरणात आरोपी नामे कार्तिक विजेंद्र जिनवाल विरुद्ध भोसरी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम ३७६, ३७६ (२) (न), ३७६ (३) अन्वये तसेच बाललैंगिक अत्याचार कलम ३,४,५ (ज) (२), ६, ८आणि १२ नुसार ०४ ऑगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

आरोपीतर्फे ऍड. प्रताप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. सिद्धांत मालेगावकर, ऍड.मजहर मुजावर आणि ऍड.यशपाल पुरोहित यांनी जामीन अर्ज दाखल केला. आरोपी हा २१ वर्षांचा तरुण असून त्याला या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने रोवण्यात आले असून आरोपी ऑगस्ट २०२० पासून जेलमध्ये असून प्रात्यक्षिकरीत्या तपास पूर्ण झाला असून फिर्यादीने नमूद फिर्याद विलंबाने दाखल केली असल्याने आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला व तो ग्राहय धरून कोर्टाने जामीन मंजूर केला.